परिक्षेचा ताण आलाय? मग थडग्यात जाऊन झोपा

924

परिक्षा म्हटले की ताण तणाव. रात्रभर जागरण, या प्रश्नाचं उत्तर येईल की नाही. मी पास होणार की नाही असे असंख्य प्रश्नमनात घोळू लागतात. पण एकाही प्रश्नाच उत्तर नीट सापडत नाही. हृद्य धडधडू लागतं. अस्वस्थ वाटू लागंत. कमी बोलणे व कमी जेवणे सुरु होते. त्यांच्या मनात अभ्यासाबद्दल भीती निर्माण होते. मग यातूनच अनेक मानसिक व्याधी जडतात. हे टाळण्यासाठी लंडनच्या एका विद्यापीठाने विद्यार्थ्यासाठी एक विहीर खणली आहे. त्यात एक थडगं खोदून ठेवले आहे. य़ा थडग्यात काही वेळासाठी शांतपणे झोपले की मनस्थाति सुधारते असा दावा संशोधकांनी केला आहे. ‘प्युरिफिकेशन थडगं’ असं जागेला नाव देण्यात आले आहे.

निजमेगन येथील  रेडबाऊंड युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरनी यावर संशोधन केले. विद्यार्थ्यांनी त्याचा अनुभवही घेतला असून थडग्यात  झोपल्यावर जी शातंता मिळते तशी कुठेङी नाही. असं त्यांनी म्हटले आहे. तसेच या थडग्यातील मनशांती अनुभवण्यासाठी अनेक विद्यार्थीही उत्सुक असून कॉलेज प्रशासनाने त्यासाठी एक वेटीगं लिस्टच बनवली आहे. या ‘प्युरिफिकेशन थडग्या’त झोपण्यासाठी तीन ते तीस मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे. पण यातून मिळणारी शांती अपूर्व असल्याचे विद्यार्थी सांगत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या