युरोपियन फुटबॉलचे विभाजन

युरोपमधील बलाढय़ देशांतील फुटबॉल क्लब्सनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. इंग्लंड, स्पेन व इटली या देशांतील 12 फुटबॉल क्लब्सनी युरोपियन फुटबॉलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नव्या सुपर लीगची घोषणाही यावेळी करण्यात आली आहे. चॅम्पियन्स लीग या युरोपमधील प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेचा प्रसार व प्रचार 2024 सालापासून करण्यास युएफाकडून नकार सांगण्यात आला. त्यानंतर तीन देशांतील नावाजलेल्या क्लब्सनी यामधून माघार घेतली आहे. या सर्व क्लब्सना स्थानिक स्पर्धांनाही मुकावे लागणार आहे. याबद्दल त्यांना सूचनाही देण्यात आली होती. पण आर्सेनल, लिव्हरपूल मँचेस्टर युनायटेड या क्लब्सचे मालक अमेरिकन आहेत. नव्या सुपर लीगचा त्यांचेही समर्थन आहे.

आपली प्रतिक्रिया द्या