…म्हणून माझे यॉर्करवर नितांत प्रेम!

सामना ऑनलाईन। लंडन

‘मी लहानपणी अंगणात खेळायचो तेव्हा कायम यॉर्क चेंडू टाकायचो. मला फारसे समजत नसतानाही मी यॉर्कर चेंडू टाकण्याचाच सराव करत असायचो. याचे कारण म्हणजे टीव्हीवर मी जेव्हा क्रिकेटचे सामने पाहायचो तेव्हा त्यात एक गोष्ट मला जाणवायची ती म्हणजे गोलंदाजाने यॉर्कर चेंडू टाकला की फलंदाज निरुत्तर होतो आणि गोलंदाजाला यश मिळते.

त्यामुळे माझ्या मनात असे समीकरणच तयार झाले की यॉर्कर चेंडू टाकले तरच बळी मिळतो. तेव्हापासून मी यॉर्कर चेंडूचा सराव करतो आहे. म्हणूनच माझं यॉर्कर चेंडूवर नितांत प्रेम आहे’ असा खुलासा बुमराहने ‘बीसीसीआय’ला दिलेल्या मुलाखतीत केला.