लंडनची तंत्रज्ञान कंपनी आपल्या रोबोसाठी शोधतेय मानवी चेहरे

253

इंग्लंडची राजधानी लंडनमधील जियोमेक या तंत्रज्ञान कंपनीने आपल्या नव्या हुबेहूब माणसासारखा दिसणाऱया आणि वागणाऱया रोबोसाठी (यंत्रमानव) मानवी चेहरे शोधण्यास सुरुवात केली आहे. कंपनीला दयाळू आणि रोबो फ्रेंडली चेहरा मिळाला की त्या चेहऱयाच्या मालकाला लेखी करार करून 92 लाख रुपये देण्याचे या कंपनीने ठरवले आहे. अगदी माणसासारखा रोबो बनवण्याचे जियोमेकचे ध्येय आहे.

जियोमेक जगातील आगळावेगळा आणि थेट माणसासारखा रोबो बनवणार आहे. त्यासाठी त्यांनी योग्य मानवी चेहरे शोधून त्यांचे पेटंट मिळवायलाही सुरुवात केली आहे. आतापर्यंत या रोबो निर्मितीची किती प्रगती झालीय हे सांगण्यास कंपनीने नकार दिला आहे. मात्र आपल्याला चीनमधील एका व्यक्तीकडून रोबोसाठी पहिला चेहरा मिळाला असून आपण त्या व्यक्तीला चेहऱयाच्या पेटंटसाठी पैसेही दिल्याचे कंपनीने कबूल केलेय.

– जियोमेकला मानवी रोबोची आयडिया चोरीला जाण्याची भीती आहे म्हणूनच माणसासारखे दिसणारे यंत्रमानव बनवण्याचा 5 वर्षांचा अनुभव पदरी असणाऱया या कंपनीने आपल्या नव्या उत्पादनाबाबत मोठी गुप्तता पाळली आहे. जियोमेकचा रोबो अन्य रोबोंपेक्षा फार आगळावेगळा असेल. त्याची माणसासारखी स्वतःची वेगळी ओळख असेल असे जियोमेकच्या तंत्रज्ञांनी सांगितले आहे. यापुढच्या टप्प्यात या मानवी रोबोसाठी मिळवल्या जाणाऱया चेहऱयांचा तपशील जाहीर केला जाईल असे कंपनीने सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या