
लखनऊमधील अलीगंज येथील आयटीआय परिसरात सोमवारी रोजगार मेळाव्यासाठी हजारो तरुणांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या मेळाव्यात मारुती कंपनी 500 पदांसाठी भरती करत आहे. नोकरी मिळवण्यासाठी दोन हजारांहून अधिक तरुणांनी गर्दी केली. उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली असून यशस्वी झालेल्या उमेदवारांची उद्या मुलाखत पार पडणार आहे. त्यानंतर अंतिम यादी जाहीर केली जाईल. मारुतीच्या हरयाणा प्लांटमध्ये भरतीसाठी आज रोजगार मेळावा सुरू आहे. मोठय़ा संख्येने उमेदवार सकाळपासूनच कॅम्पसमध्ये पोहोचले होते, अशी माहिती आयटीआय अलीगंजचे प्लेसमेंट ऑफिसर एम. ए. खान यांनी दिली. मारुतीच्या सोनीपत हरयाणा प्लांटसाठी भरती सुरू आहे. 18 ते 26 वयोगटातील उमेदवार यात सहभागी होत आहेत. निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 32 हजार पगार मिळेल.
कोणत्या पदांसाठी भरती
मारुतीच्या 500 पदांसाठी जी भरती आयोजित करण्यात आली होती, त्यात ग्राइंडर, फिटर, पेंटर, वेल्डर, ट्रक्टर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, टर्नर, मशिनिस्ट, डाय मेकर, टेक्निशियन ऑटोमोटिव्ह, मॅन्युफॅक्चरिंग, शीट मेटल वर्पर, फाउंड्रीमॅन या ट्रेड्ससाठी भरती सुरू आहे.



























































