प्रेयसीने भावाच्या मदतीने प्रियकराचा गळा चिरला, कारण ऐकून पोलिसही चक्रावले

उत्तरांखंड येथील मसूरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसीच्या कृत्याने पोलिसही चक्रावले आहेत. मसूरीच्या एका होमस्टेमध्ये प्रेयसीने भावासोबत मिळून प्रियकराची हत्या केली आहे. दोन वर्षाच्या प्रेमसंबंधानंतर लग्नाची तयारी सुरु असतानाच असे काही झाले त्यातच ही हत्या झाली.

कपिल आणि कुदरतने एकमेकांवर खूप प्रेम होते. दोघं लग्नही करणार होते. कुदरतचे कपिलवर खूप प्रेम होते. ती त्याच्यासाठी काहीही करायला तयार होती. प्रेमात आंधळी झालेल्या कुदरतने लग्नाआधीच त्याचे नाव हातावर गोंदवले होते. तिने त्याला मनातून नवरा मानले होते. मात्र सुरुवातीला लग्नासाठी तयार असलेला कपिल नंतर मागे हटला.घरच्यांच्या इच्छेनुसारच लग्न करणार असल्याचे तो म्हणत होता. त्याच्या घरच्यांना कुदरत पसंत नव्हती आणि त्यांनी त्याचे लग्न दुसरीकडे ठरवले. हे कळल्यावर कुदरत आणखी अस्वस्थ झाली. त्यानंतर तिने भावाच्या मदतीने कपिलला फोन करुन हरिद्वारला बोलावले. 8 सप्टेंबर रोजी कपिलला मसुरीला भेटायला बोलावले होते. कुदरतचा भाऊ अब्दुल्लाने तिथूनच चाकू विकत घेतला होता. त्यानंतर हे तिघेही 8 सप्टेंबरच्या रात्री कपिलच्या गाडीतून मसुरीला रवाना झाले. तिथली हॉटेल्स भरलेली होती, म्हणून परत येताना 9 सप्टेंबरला सकाळी तेथील भट्टा गावात एका होमस्टेमध्ये राहिले. त्याच रात्री कुदरतने अब्दुल्लाच्या मदतीने कपिलचा गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर कपिलची गाडी हरिद्वारला सोडून दोघे भाऊ-बहीण दिल्लीला परतले.

कपिलचे वडील मेरठमध्ये पोलीस निरीक्षक आहेत. कपिल 9 सप्टेंबरला सकाळी एका तरुण मुलगा आणि प्रेयसीसोबत होमस्टेवर पोहोचला होता. त्यावेळी त्याची हत्या करण्यात आली. दुसऱ्या दिवशी तिथे सफाई करणारी महिला खोलीत पोहोचली तिथे त्याचा मृतदेह सापडला. पोलिसांनी सीसीटिव्ही कॅमेरे तपासले असता कपिलसोबत राहिलेले तरुण तरुणी चार वाजता होम स्टेमधून बाहेर पडले. पोलिसांनी त्यांच्या गाडीची नंबर प्लेट तपासली असता ती कपिलचीच असल्याचे निष्पन्न झाले. सीसीटिव्ही फुटेज कपिलच्या कुटुंबीयांना दाखवण्यात आले. हत्येनंतर कपिलच्या गाडीतून पळून गेलेल्या कुदरत आणि तिचा भाऊ अब्दुल्ला यांना हरिद्वार येथून पोलिसांनी ताब्यात घेतले .