कमी कोलेस्ट्रॉलमुळेही हृदयविकाराचा झटका

1556

आतापर्यंत जास्त कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा झटका येतो, असे मानले जात होते. मात्र, आता कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी झाले तरी हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, असे बॉम्बे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर इंटरनॅशनल कार्डियोलॉजिस्ट डॉ. समीर पागड यांनी म्हटले आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपान, अनुवांशिकता यामुळे हा धोका काढू शकतो. शरीर आणि मनाचे आरोग्य चांगले राहील, अशी जीवनशैली आपण स्वीकारली पाहिजे, असे पागड म्हणाले. गेल्या 25 वर्षांत देशात हृदयविकाराचा झटक्याचे प्रमाण फार वाढले आहे. पाश्चात्य देशांमध्ये 70 वर्षांखालील लोकांमध्ये हृदयविकारामुळे मृत्यूचे प्रमाण 23 टक्के तर देशात हे प्रमाण 52 टक्के इतके आहे. 1990 ते 2016 दरम्यान हृदयविकाराचा झटका, इस्केमिक हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका 50 टक्क्यांहून अधिक काढला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या