लोअर परळ, वरळीतील पब, रेस्टॉरंटची झाडाझडती, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेची कारवाई

नववर्षाच्या पूर्वसंध्येला आठ वर्षांपूर्वी घडलेल्या कमला मिल आग दुर्घटनेसारखी घटना घडू नये यासाठी वरळी, लोअर परेल आणि महालक्ष्मी भागातील महत्त्वाच्या पब, रेस्टॉरंट यांची गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेच्या जी दक्षिण विभागाने झाडाझडती घेतली. यात अनावश्यक खाद्यतेल आणि सिलिंडर्सचा साठा जप्त करण्यात आला तर नियमांचे उल्लंघन करणाऱया 4 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबापुरी सज्ज होत असताना कोणतीही अनुचित दुर्घटना होऊ नये याची खबरदारी म्हणून मुंबई महापालिका परिमंडळ-2 चे उपायुक्त प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापलिका जी दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे यांना निर्देश देत तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत.

अशी झाली कारवाई

मुंबई महापालिकेच्या अधिनियम 1888 च्या कलम 394 अंतर्गत 43 आस्थापनांची झाडाझडती घेण्यात आली. त्यापैकी 17 आस्थापनांना नोटिसा जारी करण्यात आल्या असून 4 आस्थापनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर 9 व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर तसेच जास्तीचा खाद्यतेल साठा (1200 लिटर) आणि एक कोळशावरील तंदूर आणि इलेक्ट्रिक हीटर जप्त करण्यात आला.

दोन पथकांची नियुक्ती

विशेष मोहिमेअंतर्गत दोन पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. यात जी दक्षिण विभागातील अग्निशमन अनुपालन विशेष पथक, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, परिमंडळ अग्निशमन अधिकारी, अग्निशमन अनुपालन अधिकारी, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी, परवाना विभागाचे वरिष्ठ निरीक्षक आदींचा समावेश होता.

ज्या सायबर गुह्यांत फॉरेन्सिक चाचणीचा अहवाल उपलब्ध करण्यासाठी कोणत्याही न्यायालयाने आदेश दिला असेल, अशा प्रकरणांत तो अहवाल तातडीने देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असेही सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयाला कळवले.

कोर्टाने फटकारल्यानंतर सुरू केलेली कार्यवाही

  • सायबर गुह्यांच्या सुस्त तपासावर न्यायालयाने ऑगस्टमध्ये ताशेरे ओढले होते. त्यानंतर सरकारला जाग आली आणि सायबर गुह्यांच्या तपासाला गती देण्याच्या हेतूने फॉरेन्सिक चाचण्यांकडे लक्ष केंद्रित केले.
  • ‘सेमी-ऑटोमेटिक प्रोजेक्ट’ला गृह विभागाने मंजुरी दिल्यानंतर 1 ऑक्टोबर 2024 रोजी ‘वर्क ऑर्डर’ जारी करण्यात आली. त्याचबरोबर ‘डिजिटल फॉरेन्सिक सेंटर’ला 4 ऑक्टोबर 2024 रोजी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.
  • ‘डिजिटल फॉरेन्सिक सेंटर’साठी आवश्यक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आधीपासून उपलब्ध आहे. त्यामुळे ‘डिजिटल फॉरेन्सिक सेंटर’चे काम चार आठवडय़ांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
  • फॉरेन्सिक लॅबमधील मनुष्यबळ वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. फॉरेन्सिक लॅबमधील 125 रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.