स्वयंपाकाच्या गॅसची अशी करा बचत, हे करून पहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • इराण युद्धामुळे स्वयंपाकाचा गॅस महाग झाला आहे. युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे. अशा स्थितीत काही सोप्या गोष्टींमुळे गॅसची बरीच बचत करणे शक्य आहे.
  • शिजवण्यापूर्वी डाळ, तांदूळ किंवा कडधान्ये किमान अर्धा तास भिजवून ठेवा. त्यामुळे शिजण्यासाठी कमी वेळ लागतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्न शिजवताना भांडय़ावर झाकण ठेवा. यामुळे उष्णता व वाफेचा दाब आणि तापमानामुळे अन्न लवकर शिजते.
  • शक्य तिथे प्रेशर कुकरचा वापर करा. वाफेच्या दाबामुळे अन्न लवकर शिजते.