धूम्रपान न करताही फुप्फुसाचा कर्करोग, एनसीआयचे सर्वेक्षण

धूम्रपान न करताही अनेकांना फुप्फुसाचा कर्करोग होत असून शरीरातील नैसर्गिक प्रक्रियांमध्ये झालेल्या बदलाची परिणती असतो असा निष्कर्ष नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ (एनआयएच) या ‘यू एस डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अॅण्ड ह्युमन सर्व्हिसेस’चा हिस्सा असलेल्या संस्थेने काढला आहे. रेडॉन, वायू प्रदूषण, अॅस्बेस्टॉस यांसारख्या पर्यावरणातील धोकादायक अशा घटकांच्या माध्यमातून किंवा पूर्वी अस्तित्वात असलेले फुप्फुसाचे रोग यांच्या माध्यमातून काही धूम्रपान न करणाऱया व्यक्तींमध्ये होणाऱया कर्करोगावर प्रकाश टाकता येऊ शकतो. पण अजूनही शास्त्रज्ञांना हे कर्करोग कशामुळे होतात याचा पक्का निष्कर्ष काढता आलेला नाही.

हे संशोधन नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ (एनआयएच)चा भाग असलेल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूट (एनसीआय)मधील संशोधकांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय चमूने केले आहे. या अभ्यासातून ज्या व्यक्तींनी कधीही धूम्रपान केले नाही अशांमध्ये दिसून आलेली फुप्फुसाच्या कर्करोगातील तीन आण्विक उपप्रकारांवर प्रथमच प्रकाशझोत टाकला गेला आहे. हे संशोधन या आठवडय़ात ‘नेचर जेनेटिक्स’मध्ये प्रसिद्ध झाले आहे. ‘‘कधीही धूम्रपान केले नाही अशा व्यक्तींमध्ये आढळून आलेल्या फुप्फुसाच्या कर्करोगामध्ये विविध उपप्रकार आढळून आले आहेत. त्यांच्यामध्ये भिन्न आण्विक गुणवैशिष्टय़े आणि उत्क्रांतीवादी प्रक्रिया आढळून आल्या आहेत,’’ असे उद्गार एपिडेमीओलॉजीस्ट मारिया टेरेसा लांडी, एमडी, पीएचडी यांनी काढले आहेत. एनसीआयच्या कॅन्सर एपीडेमीओलॉजी अॅण्ड जेनेटिक्सचे संचालक स्टीफन जे, चॅनॉक, एमडी, म्हणाले, ‘‘जनुकीय टय़ुमर वैशिष्टय़ांच्या या सखोल अशा संशोधनातून कर्करोगाचे विविध प्रकार व मार्ग समोर येतील अशी आम्हाला आशा आहे.’’

आपली प्रतिक्रिया द्या