मृत पतीसोबत पत्नीला घालवावी लागते रात्र, या जमातीमध्ये ‘सेक्स’बाबत आहेत विचित्र नियम

जगाच्य़ा कानाकोपऱ्यात अनेक अशा जमाती आहेत ज्या मुख्य प्रवाहापासून, विकासापासून फार दूर आहेत. अशा काही आदिवासी जमातींपैकी एक जमात आहे पश्चिम केनयामधील लुओ जमात. या जमाती केनयासोबतच उत्तर युगांडा व उत्तर टांझानियामध्ये देखील आहेत. या जमातीमध्ये सेक्स, लग्न, आत्महत्या याबाबत काही विचित्र नियम आहेत.

luo-cast

– नवीन लग्न झालेला मुलगा तोपर्यंत आपल्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवू शकत नाही जोपर्यंत तो झोपणार असलेल्या बिछान्य़ावर त्याचे आई वडिल संबंध ठेवणार नाहीत. या जमातीत आई वडिलांनी त्याच बिछान्यावर ठेवलेले संबंध हे नवदाम्पत्यासाठी आशिर्वाद मानले जातात.

marraige1

– पतीच्या मृत्युनंतर पत्नीला त्याच्या मृतदेहासोबत एकाच खोलीत रात्र घालवावी लागते. रात्री पतीच्या बाजूला झोपून तिला स्वप्नात पतीसोबत संबंध ठेवावे लागतात. तसे केले तर ती पत्नी शुद्ध होते व ती दुसरे लग्न करू शकते.

dead

– पती पत्नीमध्ये जर वाद झाले आणि पत्नीने जेवण बनवायाच्या कुठल्याही वस्तूने पतीला मारले तर घरातील सर्व सदस्य एक बैठक घेतात. त्यानंतर त्या पती पत्नीतील वाद मिटविण्यासाठी त्यांना एकमेकांसोबत सेक्स करायला पाठवतात.

sex

– कापनीची वेळ आली की या जमातीत सेक्सला फार महत्त्व आहे. कापनीच्या आदल्या रात्री पती पत्नीमध्ये संबंध प्रस्थापित होणे फार गरजेचे मानले जाते. या जमातीत पुरुष किंवा स्त्री बरीच लग्न करू शकतो. मात्र कापनीच्या आधी पुरुषाला त्याच्या मुख्य पत्नीसोबत संबंध ठेवावे लागतात.

shrigonda-crops

– मोठ्या बहिणीच्या लग्नाआधी जर भावाने एखाद्या महिलेशी शारीरिक संबंध ठेवले तर त्या भावाला समाजातून बहिष्कृत केले जाते.

suicide_death_died_phansi_p

– या जमातीमध्ये आत्महत्या गुन्हा मानला जातो. जी व्यक्ती आत्महत्या करते त्याच्या मृतदेहाला चाबकाचे फटके दिले जातात. अशी व्यक्तींना दफन करण्यासाठी एक वेगळी जागा देखील ठेवली जाते. सामान्य लोकांच्या स्मशानभूमीपासून ती लांब असते. त्यांचा मृतदेह एका बॉक्समध्ये टाकून दफन केला जातो. जेणेकरून त्यांची वाईट आत्मा परत येऊ नये.

आपली प्रतिक्रिया द्या