माँसाहेबांचा आज स्मृतिदिन

तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांचा स्मृतिदिन शुक्रवार, 6 सप्टेंबर रोजी आहे. त्यानिमित्त शिवतीर्थावर माँसाहेबांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. शिवतीर्थावर सकाळी 7 वाजल्यापासून भक्तिगीत, सुगम संगीत, भजन, कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करून आदरांजली वाहण्यात येणार आहे.

सकाळी 7 वाजल्यापासून सुरू होणाऱया कार्यक्रमात पहिल्या सत्रात श्री सिद्धिविनायक सुगम संगीताचे गुणी कलाकार रविराज नर, राजा कदम, सुदेश पवार, हर्षदा वेल्हाळ, स्मिता तायशेटे, सचिन नवले, सचिन मोहिते आदी कलाकार भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. दुसऱया सत्रात आर्यदुर्गा भजन मंडळ, दादर व दैवज्ञ हितवर्धक महिला मंडळ, दादर या संस्थेच्या वतीने भजन-गीतांचा कार्यक्रम होईल, अशी माहिती स्व. सौ. मीनाताई ठाकरे स्मृती स्मारक समिती मुंबईच्या वतीने देण्यात आली.

n खोपोली येथील रमाधाम येथे माँसाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त भजन, कीर्तन असे कार्यक्रम होतील, अशी माहिती रमाधामचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य यांनी दिली.