
मालवणी नटसम्राट बाबूजी अर्थात मच्छिंद्र कांबळी यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुडाळ येथे उभारणी होत असलेले स्मारक येत्या वर्षभरात पूर्ण होईल, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
स्वर्गीय मच्छिंद्र कांबळी यांच्या रेवंडी गावी बीएसएनएल टॉवर लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्री बोलत होते. मालवण तालुक्यातील समुद्र-खाडी किनारी वसलेल्या निसर्गसंपन्न रेवंडी गावात मोबाईल सुविधेचा प्रश्नही निकाली निघाला आहे. रेवंडी भद्रकाली मंदिर परिसरात शासनाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या बीएसएनएल टॉवरचे लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.























































