‘मददगार’ने केली हजारो कश्मीरींना मदत

440

कलम 370 हटविल्यानंतर कश्मीर खोर्‍यातील जनतेत हिंदुस्थानी लष्कराची मोठी दहशत पसरेल हा फुटीरतावादी नेत्यांचा दावा फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. कश्मिरी नागरिक केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या (सीआरपीएफ) ‘मददगारया फोन हेल्पलाइनवर सतत संपर्क साधून आपल्या नातेवाईकांची खुशाली विचारत आहेत. आतापर्यंत सीआरपीएफला असे मदतीसाठीचे 34 हजार कॉल कश्मीर खोर्‍यातून आले आहेत. हिंदुस्थानची ही लष्करी हेल्पलाइन श्रीनगर येथे स्थापित करण्यात आली आहे.

 हेल्पलाइन लोकप्रिय

जम्मूकश्मीरचे 370 कलम रद्द केल्यानंतर कश्मीर खोर्‍यातील नागरिकांत अशांतता आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरवण्याचे फुटीरतावाद्यांचे मनसुबे केंद्र सरकारने मोठ्या शिताफीने उधळले. त्यासाठी काही काळ कश्मीर खोर्‍यातील मोबाईल सेवा आणि इंटरनेटही बंद ठेवण्यात आले होते. त्या काळात कश्मिरी नागरिकांनी आपल्या नातेवाईकांच्या संपर्कासाठी मोठ्या प्रमाणात सीआरपीएफच्या 14411 यामददगारहेल्पलाइनचा वापर केला. आजच्या घडीलाही संचारबंदी अथवा अन्य गोंधळाच्या क्षणी कश्मिरी नागरिकमददगारहेल्पलाइन्सशी संपर्क साधून आपत्कालीन वेळेत हिंदुस्थानी लष्कराची मदत घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या