‘मॅडम चिफ मिनिस्टर’ची नायिका ऋचा चड्डाला जिवे मारण्याच्या धमक्या

‘मॅडम चिफ मिनिस्टर’ या वादात सापडलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच या सिनेमाची नायिका ऋचा चड्डा हिला जिवे  मारण्याच्या आणि जीभ कापण्याच्या धमक्या येत आहेत. हा चित्रपट उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपाच्या प्रमुख मायावती यांच्या जीवनावर आधारित आहे. मात्र मायावती यांच्या चरित्राचा विपर्यास करणारे कथानक चित्रपटासाठी वापरण्यात आल्याचा आरोप भीम सेनेने केलेला आहे. इत्यामुळेच या चित्रपटात मुख्यमंत्र्यांची भूमिका करणाऱया ऋचा चड्डाला चित्रपटाचे पोस्टर्स आणि ट्रेलर्स रिलीज झाल्यापासून जिवे मारण्याच्या आणि अपहरणाच्या धमक्या भीम सेनेच्या कार्यकर्त्यांकडून येत आहेत. भीम सेना प्रमुख नवाब सतपाल तन्वर यांनी रिचाची जीभ कापून आणणाऱयाला इनामही जाहीर केले आहे. सिनेमावरील वादानंतर ऋचाने सर्वांची जाहीर माफीही मागितली होती, पण तरीही विरोधकांचे समाधान झालेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या