मेड इन इंडिया फौ-जी गेमला तुफान प्रतिसाद!

मेड इन इंडिया फौ-जी गेमला तुफान प्रतिसाद मिळत असून अवघ्या 24 तासांत तब्बल 10 लाख लोकांनी हा गेम डाऊनलोड केला आहे. 26 जानेवारीला हा गेम लाँच झाला असून सध्या केवळ अँड्रॉइड मोबाईलसाठी हा गेम उपलब्ध आहे. त्यामुळे त्यामुळे आयफोन युजर्सना हा गेम खेळण्यासाठी अजून वाट बघावी लागणार आहे.

हिंदुस्थान आणि चीनी सैन्यामध्ये गलवान खोऱयात झालेल्या संघर्षानंतर लोकप्रिय ऑनलाइन बॅटल रॉयल गेम पब्जी देशात बॅन झाला. त्यानंतर फौ-जी गेमची घोषणा झाली होती. अखेर हा गेम आता उपलब्ध झाला आहे. एन कोर गेमिंग नावाच्या एका हिंदुस्थानी कंपनीने हा गेम डेव्हलप केला असून अभिनेता अक्षय कुमार गेमला प्रमोट करत आहे.लाँच होण्यापूर्वीच 50 लाखांपेक्षा जास्त जणांनी या गेमसाठी प्री-रजिस्टर केले होते. त्यानंतर आता प्ले-स्टोअरवरील आकडेवारीवरुन अवघ्या 24 तासांमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त युजर्सनी हा गेम डाउनलोड केले आहे. 460 एमबी साइज असलेल्या या गेमला युजर्सकडून प्ले-स्टोअरवर 4.7 रेटिंग मिळाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या