आपला चांदोबा

155

>>माधव डोळे

आज त्रिपुरारी पौर्णिमाचंद्र आणि आपला अगदी जवळचा संबंध. कधी प्रियकर, कधी भाऊप्रत्येक नातं तो निभावतोकधी त्याला अशुभ मानल्याचाही तो राग धरत नाहीफक्त आपली शीतलता सांडत राहतोचहूकडे अंगाने

चंद्रआपल्या तना-मनाला मोहवणारा, शीतल माया देणारा आपल्या काळजाचा जणू तुकडाच. त्याचं आणि माणसाचं नातं हे शब्दात सांगता येणार नाही. चंद्र हा आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक आहे. त्याचा शीतल प्रकाश… कला आणि मोहक रूप याच्या प्रेमात पृथ्वीवरचा प्रत्येक माणूस आहे. 1969मध्ये नील आर्मस्ट्राँग आणि ऑल्ड्रीन यांनी पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवलं त्याला आता अनेक वर्षे लोटली. तरीदेखील त्याच्याबद्दलचं आकर्षण, शोध अद्यापही सुरूच आहे. धार्मिक तसेच खगोलशास्त्राrय दृष्टीने चंद्राला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. चंद्रबळावरच ज्योतिषाची बरीच गणितं अवलंबून असतात. समुद्राच्या भरती-ओहोटीपासून ते अगदी आपल्या पोटातील अन्नाचे पचन होणं अशा अनेक गोष्टींशी चंद्राचा आणि माणसाचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध आहे. नवग्रहस्तोत्रातील चंद्राच्या मंत्राचे उच्चारण केल्यामुळे शरीरात पॉझिटिव्ह स्पंदने तयार होतात. हा मंत्र असा आहे –

दधिशंखतुषाराभं क्षीरार्णवसमुद्भवम्

नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुटभूषणम्

हिंदू धर्मात जशी चंद्राची उपासना सांगितली आहे त्याचप्रमाणे सण-वार-उत्सव अगदी धार्मिक कार्येही चंद्रावरच अवलंबून आहेत. पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही बाबी कालगणनेप्रमाणे येत असतात. ज्या दिवशी पूर्ण चंद्रबिंब दिसते तो दिवस म्हणजे पौर्णिमा. आपल्या बारा महिन्यांमध्ये बारा पौणैमा येतात. त्यातील प्रत्येक पौर्णिमेला धार्मिकदृष्टय़ा अतिशय महत्त्व आहे. हनुमान जयंतीला चैत्र पौर्णिमा, बुद्ध पौर्णैमेला वैशाख पौर्णिमा असंही संबोधलं जातं. ज्येष्ठातील वटपौर्णिमा तर अतिशय प्रसिद्ध आहे. आश्विन महिन्यात येणाऱया कोजागरी पौर्णिमेची तर सर्वच वाट पाहतात; कारण कोजागरीची रात्र चंद्राच्या शीतल लख्ख प्रकाशात घालवणं ही धार्मिक परंपरा बनली आहे. त्यास कौमुदी महोत्सव असंही म्हटलं जातं. शास्त्रात या दिवशी चंद्राची पूजा करावी असं सांगितलं आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी लोक समुद्राला नारळ अर्पण करून त्या दिवसापासून मच्छीमारी सुरू करतात. राखी पौर्णिमा तर मोठा सण. बहीण आपल्या लाडक्या भावाला औक्षण करून राखी बांधते. पण जिला बहीण नाही तिने चंद्रालाच आपला भाऊ मानून ओवाळावे असा प्रघात आहे. प्रत्येक सण तसेच धार्मिक कार्य हे चंद्र व पौर्णिमेशी संबंधित आहे. दिवाळीच्या दिवसातील त्रिपुरारी पौर्णिमा हा तर प्रकाशाचा उत्सव. आपलं मन आणि आयुष्यही चंद्राच्या शीतल प्रकाशाप्रमाणं उजळून निघावं अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. शुभकार्यासाठी अनेकजण पसंती देतात ती फक्त पौर्णिमेलाच. शुभकार्य आणि पौर्णिमा याचं जवळचं नातं आहे. हवाहवासा वाटणारा हा चंद्र कुणाचा चंदामामा, कुणाचा प्रियकर तर कुणाचा मित्र असतो. म्हणूनच ज्योतिष, विज्ञान, खगोलशास्त्र, धर्म काहीही असो चंद्र आणि माणूस याचं नातं यापुढेही कायम राहील.

> रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी, राहू, केतू हे नऊ ग्रह असून त्यात चंद्राला अतिशय महत्त्व आहे. स. कृ. देवधर यांच्या नवग्रह उपासना व फलशृती या पुस्तकात म्हटलंय की, ‘चंद्र हा सूर्याकडून प्रकाशित होत असल्याने चंद्राला कला प्राप्त होतात. या प्रत्येक कलेला वेगवेगळा अर्थ आहे आणि त्या कलांचे प्राणीसृष्टीवर होणारे परिणामही विविध प्रकारचे आहेत. चंद्र हा पृथ्वीच्या बराच जवळ असल्याने उपासनेच्या दृष्टीने त्याचा फार मोठा फायदा उपासकाला मिळतो.’

> हिंदू धर्मातील प्रत्येक घटकासोबत चंद्राशी नाते जोडले आहे. एवढंच नव्हे तर सण, उत्सव, व्रत, वैकल्ये, शुभकार्य याचा चंद्राशी जवळचा संबंध आहे. विराट पुरुषाच्या मनापासून चंद्राची निर्मिती झाली असा उल्लेख पुरुषसुक्तात आहे. ‘चंद्रमा मनसो जातः’ असे त्यात म्हटलंय. 27 नक्षत्रांपैकी एक असलेल्या मृग नक्षत्रात चंद्राची पूजा करावी असे शास्त्रात नमूद केलं आहे. खगोलशास्त्राच्या दृष्टीने चंद्र हा एक ग्रह असला तरी हिंदू धर्मात चंद्राला देवता मानलं गेलं आहे. नवग्रहांपैकी एक चंद्र असून त्याची पूजा प्रत्येक धार्मिक कार्यात केली जाते.

सालाबादप्रमाणे यंदाही वसई पश्चिम येथील आनंदनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने तुळशीविवाह सोहळा मंगळवारी थाटात साजरा केला. विभागप्रमुख विद्याधर चेंडेकर यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्यात परिसरातील अनेक रहिवाशी सहभागी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या