नितीश कटारा हत्याकांड- विकास यादवला पॅरोल नामंजूर

425

 नितीश कटारा हत्याकांडात गेल्या 17 वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या विकास यादव याला चार आठवडय़ांची सुट्टी हवी आहे. मात्र ‘‘तुला 25 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ती पूर्ण कर’’ असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने त्याचा पॅरोल नामंजूर केला. बिझनेस एक्झिक्युटिव्ह नीतीश कटारा याची 2002 साली हत्या करण्यात आली होती.

 

दिल्ली उच्च न्यायालयाने या हत्या प्रकरणात विकास यादव, त्याचा चुलतभाऊ विशाल यादव यांना प्रत्येकी 25 वर्षांची आणि सुखदेव पेहलवान याला 20 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. 2014 साली उच्च न्यायालयाने याबाबतचा कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवला होता. मात्र विकास यादवने याबाबत उच्च न्यायालयाच्या अधिकारावरच बोट ठेवत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तेथेही त्याची याचिका फेटाळण्यात आली.

 

बहिणीच्या अफेअरमुळे हत्या

 

नीतीश कटारा याची हत्या 16 फेब्रुवारी 2002 रोजी रात्री करण्यात आली होती. त्याचे विकास यादवच्या बहिणीशी, भारती यादवशी अफेअर होते. मात्र दोघांच्या जाती वेगवेगळ्या असल्याने भारतीचे कुटुंबीय नीतीशवर नाराज होते. त्यामुळेच विकासने नीतीशचा काटा काढण्याचा डाव रचला. दिल्ली उच्च न्यायालयाने विकास आणि विशाल यांना या प्रकरणी दोषी ठरविले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या