मढीतील कानीफनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या दुकानांना आग

272
kanifnath-temple-shops-fire

नगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र मढी येथील कानीफनाथ मंदीराच्या पायथ्याला असलेल्या दुकानांना मंगळवारी रात्री उशिरा आग लागली होती. पूजा साहित्य विक्री करणाऱ्या दुकानाला भीषण आग लागल्यानंतर ही आग वेगानं पसरू लागली.

आगीचे वृत्त तात्काळ वृद्धेश्वर कारखाना आणि पाथर्डी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला कळवण्यात आली. त्यानंतर लगेचच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. या आगीमुळे पूजा साहित्य विक्रीदुकानाच्या आजूबाजूची दुकाने देखील आगीत जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या