
येत्या 27 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर ’फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलिवूड वाईफ्स’ हा वेब रिऑलिटी शो प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पत्नींवर आधारित हा वेब शो आहे. प्रदर्शनापूर्वी त्याच्या नावामुळे शो वादात सापडला आहे. आपल्या आगामी सिनेमाचे नाव ’बॉलिवूड वाईफ्स’ असून ते निर्माते करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी वेबसीरिजसाठी काॅपी केल्याचा आरोप निर्माते मधुर भांडारकर यांनी केला आहे. भांडारकर यांनी आता शोचे शीर्षक बदलण्याची विनंती करण जोहर आणि मेहता यांना केली आहे. फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलिवूड वाईफ्स’मध्ये बॉलिवूड कलाकारांच्या पत्नींचे जीवन जवळून बघायला मिळणार आहे.
आपली प्रतिक्रिया द्या