
कोल्हापूरच्या नांदणीतून गुजरातच्या वनतारा येथे नेण्यात आलेल्या माधुरी हत्तीणीच्या मुद्दय़ावर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. ही हत्तीण पोहोचवण्यात आली की नाही याची माहिती देण्यासाठी ही सुनावणी होणार आहे. मात्र याच सुनावणीत माधुरीला वनतारा येथून पुन्हा नांदणी गावात आणण्याच्या कायदेशीर पर्यायाचा तपशील न्यायालयाला देण्यात येणार आहे. नांदणी येथील मठाकडून अॅड. मनोज पाटील यांच्यासह अन्य वकिलांची फौज यावर युक्तिवाद करणार आहे.