सासूसोबत ‘लिव्ह-इन’मध्ये राहत होता शाहरुख खान, केली हत्या

3643
murder

मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे जावयानेच आपल्या सासूची गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. शाहरुख खान असे आरोपीचे नाव आहे. ही घटना भोपाळ येथील अशोक गार्डन परिसरात घडली आहे. मृत महिला ही आपल्या जावयासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहत होती, असे बोलले जात आहे.

आजतक या वृत्तवाहिनीच्या संकेत स्थळाने असे वृत्त प्रसिद्ध केले आहे. मृत महिलेचे नाव शाहीन असे होते. शाहरुखचे लग्न हे शाहीन यांच्या मुलीशी झाले होते. मात्र शाहीन यांचे आपल्या जावयासोबत प्रेमसंबंध जुळल्याने त्या आपल्या पतीशी विभक्त होऊन, शाहरुख सोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागल्या. शाहीन ही देहव्यापार करीत होती. हे शारुखला आवडत नव्हतं. त्याने तिला अनेकवेळा ‘देहव्यापार करू नको, यातून बाहेर पड’ असे सांगत समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शाहीन त्याचं ऐकत नव्हती. याच गोष्टीवरून त्यांच्यात रविवारी भांडण झालं. हे भांडण इतकं वाढलं की शाहरुखने रागाच्याभरात शाहीनची गळा दाबून हत्या केली. हत्यानंतर शाहरुखने आपल्या मित्राला फोन करून घडलेल्या घटनेबद्दल माहिती दिली आणि तो फरार झाला.

दरम्यान, हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून फरार आरोपी शारुखचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या