मध्य प्रदेशात 13 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, सात जणांना अटक

प्रातिनिधीक फोटो

मध्य प्रदेशातील उमरिया गावात एका 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचं वृत्त आहे. या प्रकरणी नऊ जणांवर आरोप असून त्यापैकी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना 4 जानेवारी रोजी घडली. त्या दिवशी पीडित मुलीशी गोड बोलून तिच्या ओळखीच्याच लोकांनी तिचे अपहरण केले. अपहरण केल्यानंतर त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

काही वेळाने त्यांनी तिला सोडून दिलं. ती घरी आल्यावर तिच्यावर नऊ जणांनी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध तिच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 जानेवारी रोजी तिच्या आईने आपल्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे. नऊ जणांपैकी सात जणांना अटक केली असून अजून दोन जणांचा पोलीस शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या