मांडवा ते भाऊचा धक्का रोरो बोटसेवेचे दर महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून जाहीर

947

भाऊचा धक्का ते अलिबाग-मांडवादरम्यान जलमार्ग रोरो बोटसेवा वाहतूक मार्च महिन्यात सुरू होत आहे. या रोरो बोटसेवेचे तिकीट दर काय असतील याची सर्वांना उत्सुकता लागली होती. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने रोरो बोटसेवेचे दर जाहीर केले आहेत. सर्वसाधारण श्रेणीचे दर 220 रुपये, वातानुकूलीत श्रेणीचे दर 330 रुपये, तर अलिशान श्रेणीसाठी 550 रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. तर वाहनांसाठी कारच्या आकारमानाप्रमाणे किमान 1100 ते कमाल 1500 आणि 1900 असे दर असणार आहेत. मात्र हे दर जास्तीचे असल्याने प्रवाशांच्या खिशाला आर्थिक चाट बसणार आहे.

भाऊचा धक्का ते अलिबाग मांडवा या रो-रो जलवाहतूक सेवेला मार्च महिन्याचा मुहर्त मिळणार असल्याचे निश्चित झाले असून प्रवासी दर महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डने जाहीर केले आहेत. उद्घाटनाची तारीख निश्चित झाल्यावर अॅडव्हान्स बुकिंग सुरू करण्यात येणार आहे. या जहाजात 1500 प्रवासी आणि 200 चारचाकी वाहनांची सोय आहे.95 मीटर लांब आणि 18 मीटर रुंद असलेल्या या जहाजाला ताशी 15 सागरी मैलचा वेग असेल. भाऊचा धक्का ते अलिबाग मांडवा ही प्रतीक्षेत असलेली प्रोटो प्रोसेस एक्सव्ही ही अत्याधुनिक रोरोबोट मुंबईत दाखल झाली आहे. मेरिटाईम बोर्डाने जाहीर केलेले दर हे सर्वसामान्य प्रवाशांच्या आवाक्याच्या बाहेर असल्याचे दिसत आहे. मांडवा ते गेटवे चालणारी जलवाहतूक सेवेचे दर कमी आहेत. त्यामुळे त्याद्वारे प्रवास करणे प्रवाशांना सुखकारक आणि कमी दरात करणे सोयीस्कर आहे.

रोरो बोटसेवेचे वाहनाचे दर हे 1100 ते 1900 एवढे असल्याने वाहन नेणाऱ्या प्रवाशांना हा दर जास्तीच आहे. मुंबई ते अलिबाग हे रस्तेमार्ग अंतर सव्वाशे किलोमीटर असले तरी वाहन घेऊन येणाऱ्या प्रवाशांना आताच्या रोरोच्या तिकीट दराच्या मानाने रस्तेमार्ग खर्चाच्या मानाने कमी पडणार आहे. त्यामुळे हा दर कमी व्हावा अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या