मागाठाणेत चुरशीची लढाई

1098

मनसेचा गड असणाऱया मागाठाणे विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रकाश सुर्वे यांनी 2014 च्या निवडणुकीत मनसेला धक्का देत येथे शिवसेनेचा भगवा फडकवला. गेल्या 5 वर्षात त्यांनी या ठिकाणी केलेल्या विकासकामांमुळे पुन्हा ते बाजी मारतील अशी चर्चा आहे. मात्र,मनसेने नयन कदम यांना येथून उमेदवारी देत सुर्वे यांच्यासमोर पुन्हा तगडे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे या ठिकाणी चुरशीची लढाई पाहयला मिळणार आहे. दरम्यान, मागच्या निवडणुकीत सुर्वे यांच्यासमोर उभे असणारे प्रवीण दरेकर हे सध्या भाजपात असल्याने तसेच शिवसेना-भाजपाची या निवडणुकीत युती झाल्याने दरेकर समर्थकांची मते सुर्वे यांच्या पारडय़ात पडणार आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून मागाठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्लाच राहिला आहे. त्यामुळेच 2017च्या पालिका निवडणुकीत विभागातील आठपैकी सहा नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले आहेत. यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून होणाऱया विकासकामांमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, ‘मनसे’च्या हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे या विभागात शिवसेनेचा गड आणखी मजबूत झाला आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांनी विभागातील गोरगरीबांसाठी दहिसर पश्चिम आनंद नगर येथे डायलेसिस सेंटर उभारल्याने शेकडो रुग्णांना फायदा होत आहे. गोरगरीबांच्या शस्त्र्ाक्रियेसाठी 10 कोटींवर रुपये खर्च केले आहेत. शिवाय अद्ययावत फायर ब्रिगेड स्टेशन, कुलूपवाडी जलतरण तलाव, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, डोंगरावर टाकी बसवून हनुमान टेकडीसारख्या उंच भागात पाणीपुरवठय़ाचा प्रश्न सोडवण्यात आला आहे.

मतदारसंघातील समस्या
मागाठाणे मतदारसंघात प्रकाश सुर्वे आणि प्रवीण दरेकर हे दोन युतीचे आमदार आहेत. तरीही या ठिकाणी मूलभूत प्रश्न कायम आहेत.
हा भाग बोरीवली नॅशनल पार्कच्या अखत्यारीत येतो. त्या ठिकाणी असणाऱ्या आदिवासींना पायाभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. तसेच त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही रखडलेला आहे.
रस्ते आणि सार्वजनिक शौचालयांची कामे झालेली असली तरी ती पुरेशा प्रमाणात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
घराघरात संपर्क, विकासकामांचा ओघ
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रहिवासी, पर्यटकांसाठी फिरते रुग्णालय, संजय गांधी उद्यानात 1 लाख झाडे लावून त्यांचे संगोपन करणे, आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळाच्या धर्तीवर विकास करणे असे महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या