माघी वारीत विठ्ठलचरणी दीड कोटीचे दान

22

सामना ऑनलाईन । पंढरपूर

दोन दिवसांपूर्वी झालेल्या माघी वारीत श्री विठ्ठल-रखुमाईच्या चरणी वारकऱ्यांनी तब्बल 1 कोटी 58 लाख 57 हजार 891 रुपयांचे दान अर्पण केले. गेल्या वर्षी 1 कोटी 10 लाख 38 हजार 829 रुपये उत्पन्न श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला झाले होते असे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. 5 लाखांच्या आसपास भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. श्री विठ्ठलाच्या चरणावर 16 लाख 55 हजार 599 रुपये तर रुक्मिणीमातेच्या चरणावर 4 लाख 49 हजार 12 रुपये, पावती स्वरूपातील देणगी 45 लाख 24 हजार 266 रुपये, बुंदी लाडूप्रसाद विक्रीतून 25 लाख 63 हजार रुपये, राजगिरा लाडू विक्रीतून 3 लाख 53 हजार, फोटो विक्री 51 हजार 550 रुपये,  भक्तनिवासमधून 6 लाख 45 हजार 425 रुपये देणगी, नित्यपूजेमधून 2 लाख 86 हजार रुपये देणगी, हुंडी पेटीतील जमा 31 लाख 58 हजार 718 रुपये, ऑनलाइन देणगी 1 लाख 77 हजार 528 रुपये व अन्य स्वरूपातील देणगीतून 18 लाख 3 हजार 423 रुपये इतक्या रकमेचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या