महाकुंभात साडेसहा कोटी भाविकांचे स्नान

महाकुंभासाठी 10 देशांमधून आलेल्या 21 शिष्टमंडळांतील सदस्यांनी संगम तटावर डुबकी घेऊन स्नान केले. त्यानंतर या भाविकांनी सर्व आखाडय़ांना भेटी दिल्या आणि महाकुंभचे धार्मिक महत्त्व जाणून घेतले. हिंदुस्थानी संस्कृतीचे अनेक पैलू यावेळी त्यांना उलगडून दाखवण्यात आले. हे सर्व जाणून घेताना ते भरावून गेले होते.

महाकुंभात इस्कॉनच्या शोभायात्रेत परदेशातील भाविकांनी ‘हरे राम हरे कृष्ण’ भजन गात एकच ठेका धरला. संगम तटावर आज चौथ्या दिवशी 25 लाख भाविकांनी स्नान केले. 13 जानेवारीपासून आतापर्यंत देशविदेशातील जवळपास साडेसहा कोटी भाविकांनी संगम तटावर स्नान केले. दुसरीकडे महाकुंभमध्ये आयआरसीटीसीची टेंट सिटी 30 जानेवारीपर्यंत फुल झाली असून या टेंट सिटीसाठी बुकिंग करायचे असेल तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ाची वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, 24 जानेवारी रोजी महाकुंभमध्ये बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्राr संगम तटावर स्नान करण्यासाठी पोहोचणार आहेत. महाकुंभमध्ये ते तीन दिवस कथासार सांगणार आहेत. दरम्यान, आज गंगा पंडाल येथे गायक शंकर महादेवन यांनी कार्यक्रम सादर केला.