अनैसर्गिक युतीची सत्ता जास्त काळ टिकणार नाही – देवेंद्र फडणकीस

devendra-fadnavis

अनैसर्गिक युती देशाच्या राजकारणात कधी फारशी टिकली नाही. महाराष्ट्र विकास आघाडी ही अनैसर्गिक युतीची सत्ता आहे. ती जास्त काळ टिकत नाही असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. आम्ही सरकारकडे लक्ष देत नाही. कारण महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक आंतरविरोध आहेत. हे सरकार आंतरविरोधाने भरलेले आहे. कुणाचाच पायपोस कोणाच्या पायात नाही. त्यामुळे हे सरकार जितके दिवस चालायचे तितके दिवस चालेल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या