ऑनलाइन गेमिंग ऍप महादेव बेटिंग ऍपप्रकरणी आज ईडीने अभिनेत्री तमन्ना भाटियाची चौकशी केली. आज तम्मन्ना भाटिया ईडीच्या कार्यालयात आपल्या आईसोबत गेली होती. गेल्या वर्षीही तमन्ना भाटियासह अभिनेता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांची चौकशी करण्यात आली होती. 2023 च्या एका रिपोर्टनुसार या घोटाळ्यात 17 बॉलीवूड स्टार चौकशीच्या फेऱयात आहेत. महादेव ऑनलाइन गेमिंग ऍपचा संस्थापक सौरभ चंद्राकार आहे. दरम्यान, याप्रकरणी कपिल शर्माचीही चौकशी करण्यात आली होती.