महानंदने दुधाचा खरेदी दर वाढवला, विक्री दर मात्र स्थिर

653

शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाच्या दरात महानंदने एक रुपयाची वाढ केली आहे. राज्यातील ओल्या दुष्काळामुळे चाऱयाच्या आणि खुराकाच्या किमती वाढल्या आहे. त्यामुळे दुधाच्या दरात वाढ करण्याची मागणी शेतकऱयांकडून केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रतिलिटर दुधाचा खरेदी दर 27 रुपयांवरून 28 रुपये एवढा करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र विक्री दर स्थिर राहणार आहे.

महानंद डेअरी दररोज सुमारे अडीच लाख लिटर दुधाचे वितरण करते. सदर दूध दूध तालुका आणि जिल्हा दूध संघांच्या माध्यमातून शेतकऱयांकडून घेतले जाते. दुष्काळामुळे जनावरांची संख्या घटलेली असल्याने दुधाचे उत्पादन घटले होते. त्यातच ओल्या दुष्काळामुळे चाऱयाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे दुधाचा दर वाढवून देण्याची मागणी शेतकऱयांकडून केली जात होती. त्याची दखल घेत आज सरकारने जाहीर केलेला दुधाचा खरेदी दर 25 रूपये असतानाही महानंदने खरेदी दरात वाढ केली आहे. राज्यातील इतर खासगी दूध संघांचा दर महानंदच्या तुलनेने कमी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या