निझामुद्दिन मरकजमध्ये महाराष्ट्रातील दिडशेहून अधिक सहभागी, पोलीस घेत आहेत शोध

3708

दिल्लीतल्या निझामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या मरकजमध्ये महाराष्ट्रातील दिडशेहून अधिक जण सहभागी झाले होते अशी माहिती समोर आली आहे. यात पुण्यातून 130, नगरमधील 39 तर संभाजीनगरमधून 47 जण सहभागी झाले होते. या सर्वांचा पोलीस शोध घेत आहेत. पुण्यात 40 जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे तर नगरमधील दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

याव्यतिरिक्त सोलापूर जिल्ह्यातील 16, नांदेड जिल्ह्यातील 13 तर परभणी जिल्ह्यातील तीन जण, अकोला जिल्ह्यातील 10 आणि चंद्रपूरच्या एकाचा यात सहभाग होता असं समजतं. पोलीस आणि आरोग्य यंत्रणेतर्फे त्यांचा शोध घेतला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या