राज्यात दिवसभरात 20 हजार 482 नवे रुग्ण

357

राज्यात मागील 24 तासांत 20 हजार 482 नवे कोरोनाबाधित आढळले असून 515 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 19 हजार 423 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना आज रुग्णालयांमधून डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. राज्यात सध्या 2 लाख 91 हजार 797 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत 7 लाख 75 हजार 273 जण  कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 70.62 टक्के आहे. आजपर्यंत प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेल्या 54 लाख 9 हजार 60 नमुन्यांपैकी आजपर्यंत 10 लाख 97 हजार 856 नमुने (20.2 टक्के) पॉझिटिव्ह आढळले आहेत. सद्यस्थितीस राज्यात 17 लाख 34 हजार 164 जण होम क्वारंटाइन आहेत, तर 37 हजार 225 जण इन्स्टिटय़ूशनल क्वारंटाइनमध्ये आहेत.

मुंबईत 1,585 कोरोना रुग्ण
मुंबईत आज दिवसभरात 1,585 कोरोना रुग्ण सापडले असून गेल्या 24 तासांत 1,717 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणार्यांची संख्या आता 1 लाख 34,066 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 49 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत 49 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 8 हजार 227 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 54 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 30 हजार 879 इतकी आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 49 लाखांपार

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 49 लाखांच्या पुढे गेली आहे. मागील 24 तासांत कोरोनाचे 83,809 रुग्ण वाढले, तर 1045 जणांचा महामारीत मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मंगळवारी सकाळी ही माहिती जाहीर केली.

मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशभरातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 49 लाख 30 हजार 327 झाली आहे. यापैकी केवळ 9 लाख 90 हजार 061 इतकेच अॅक्टिव्ह रु0ग्ण आहेत. उर्वरित 38 लाख 59 हजार 400 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी उपचार घेऊन रुग्णालयातून सुखरूप घर गाठले आहे. महामारीत एकूण 80,776 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावा लागल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या