चिखल तुडवत ते केंद्रावर पोहोचले, पण मतदानाचा हक्क बजावलाच

latur-mud-election

#MahaElection 2019 परतीच्या पावसाने दिलेल्या तडाख्याने लातूर जिल्ह्यात दैना उडवली आहे. मतदान केंद्राची अवस्था अत्यंत बिकट झाली असून त्याचाही मतदानावर परिणात होईल असे चित्र आहे. मतदारांना मतदान करण्यासाठी मतदान केंद्रामध्ये जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. मात्र असे असले तरी अशा केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदार पोहोचत आहे.

लातूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगलाच दणका दिला आहे. सोमवारी सकाळी देखील रिमझीम पाऊस सुरू होता. त्यामुळे मतदार मतदानासाठी प्रारंभी घराच्या बाहेर पडलेच नाहीत. काही उत्साही मतदारांनी मात्र पावसाची तमा न बाळगता छत्री घेऊन, चिखल तुडवत मतदान केंद्र गाठले. मतदान केंद्रामध्ये जाण्यासाठी रस्ताच शिल्लक नव्हता. काही ठिकाणी पाणी साठून तळ्याचे स्वरुप प्राप्त झालेले होते. तर काही ठिकाणी चिखलाने रस्ता निसरडा झालेला होता. तारेवरची कसरत केल्याप्रमाणे मतदारांना मतदान केंद्रात जाण्यासाठी कसरत करावी लागली.

आपली प्रतिक्रिया द्या