विधानसभा २०१९ – महाराष्ट्रातील चुरशीच्या लढती, वाचा सविस्तर…

64888

#Mahaelection2019 विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा आता थंडावला आहे. मतदानासाठी आता फक्त काही तास बाकी आहेत. 21 ऑक्टोबरला मतदान आणि 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार असून या निवडणुकीमध्ये आपल्याला अनेक चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. राज्यातील तुल्यबळ लढतींवर एक नजर टाकूया…

नागपूर दक्षिण पश्चिम –

devendra-fadnavis-ashish-de
पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करणारे फक्त दुसरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिममधून उमेदवारी लढवणार आहेत. मुख्यमंत्र्यांविरुद्ध काँग्रेस उमेदवार आशिष देशमुख रिंगणात आहेत.

बारामती –

ajit-pawar-gopichand-padalk
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमधून निवडणूक लढवणार आहेत. अजित पवार यांच्याविरोधात भाजपाचे तगडे उमेदवार गोपीचंद पडळकर मैदानात उतरले आहेत.

परळी –

pankaja-munde-dhananjay-mun
परळीमध्ये पुन्हा एकदा बहिण-भावातील द्वंद्व पाहायला मिळणार आहे. महिला, बालविकास मंत्री पंकजा मुंडे बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा जागेवर भाजपच्या तिकिटावर लढत आहेत. या जागेसाठी पंकजा मुंडे यांच्यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांचे आव्हान आहे.

दक्षिण कराड –

ashok-chavan-atul-bhosale
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण सातारा जिल्ह्यातील दक्षिण कराडमधून निवडणूक लढवणार आहे. या जागेसाठी पृथ्वीराज चव्हाण यांना भाजपच्या अतुल भोसले यांचे मोठे आव्हान आहे.

येवला –

chhagan-bhujbal
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे येवला विधानसभा मतदारसंघातून रिंगणात आहेत. छगन भुजबळ यांच्या विरोधात शिवसेनेच्या संभाजी साहेबराव पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. येवला विधानसभा जागेसाठी 30 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

शिर्डी –

radhakrishna-vikhe
राधाकृष्ण विखे पाटील यांची नगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभेची जागाही खास चर्चेत आहे. विखे पाटील यांच्या विरोधात काँग्रेसच्या तिकीटावर सुरेश जगन्नाथ थोरात निवडणूक रिंगणात उतरले आहेत. एकेकाळी एकाच पक्षातून लढणारे हे दोघे नेते आमनेसामने आले आहेत.

पाचपाखाडी –

eknath-shinde
शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील पाचपाखाडीमधून चौथ्यांदा निवडणूक लढवणार आहे. एकनाथ शिंदे यांना काँग्रेसच्या संजय पांडुरंग घाडीगांवकर यांचे आव्हान आहे. या जागेसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत.

नालासोपारा –

ips-pradeep-sharma
माजी मुंबई पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांची विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी खास ठरत आहे. प्रदीप शर्मा नालासोपारामधून शिवसेनेकडून निवडणूक लढवणार आहे. प्रदीप शर्मा यांना बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार क्षितिज ठाकुर यांचे आव्हान आहे.

बीड –

jaydutt-kshirsagar-sandeep
बीडमधील परळीमध्ये एकीकडे ही बहीण-भावाची लढाई आहे तर दुसरीकडे बीड विधानसभा मतदारसंघात काका-पुतण्याचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. कॅबिनेट मंत्री जयदत्त क्षीरसागर शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जोरदार आव्हान दिले आहे.

नांदेड –

bapusaheb-gorthekar-chavna
नांदेडमध्ये लोकसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे ही विधानसभा निवडणूक अशोक चव्हाण यांच्या अस्तित्वाची लढाई असणार आहे. अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध भाजपचे बापूसाहेब गोरठेकर मैदानात उतरले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या