भाजपचा ‘संकल्प’ – रोजगाराच्या संधी आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्र

cm-devendra-fadnavis

#MahaElection 2019 विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या रणमैदानात उतरलेल्या विविध पक्षांनी आपले जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत. आज भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजपकडून जाहीरनामा संकल्पपत्र म्हणून सादर केला जातो. पुढील पाच वर्षांत राज्यातील नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प भाजपने आपल्या जाहीरनाम्यातून मांडला आहे.

मुंबईतील रंगशारदा सभागृहात आज भाजपचे संकल्पपत्र प्रकाशित करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा हे उपस्थित होते.

मराठवाड्यासह राज्यातील अन्य दुष्काळी भागात त्यांना त्यांच्या हिस्स्याचं पाणी देणार. पुरातून वाहून जाणारं पाणी जे महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यांचे नाही ते कॅनलद्वारे दुष्काळी भागात पोहचवू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवू मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प राबवू, असे सांगतानाच ट्रिलिअन डॉलर इकोनॉमीसाठी रोड मॅप तयार करून त्यादिशेने वाटचाल करणार असेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या