
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्राचा कोनशिला समारंभ आणि कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती विशेष अध्यासन केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “जेएनयूमध्ये मराठी भाषेचं अध्यासन होत आहे. मराठी ही देशातील अतिशय प्राचीन भाषा आहे.” तसेच त्यांनी जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार असल्याची घोषणाही यावेळी केली.
दरम्यान, जेएनयूमध्ये येथे पोहोचताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करत घोषणाबाजी केली. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गो बॅक, अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या.