अतिआत्मविश्वासात राहू नका, राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांना सूचना

हरयाणात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा पराभव पत्करावा लागला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत राहुल गांधी यांनी नेत्यांना अतिआत्मविश्वास टाळावा, अशी सूचना दिला आहे. ते म्हणाले एकजुटीने काम करा आणि अति आत्मविश्वास बाळगू नका, असे राहुल गांधी म्हणाले.

महाराष्ट्राबरोबरच झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला हरयाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये चांगला निकाल मिळतील, अशी आशा होती. विशेष करून हरयाणात पक्ष स्वबळावर सत्तेवर येईल असा विश्वास होता. मात्र निकाल भाजपच्या बाजूने लागल्याने काँग्रेसला धक्का बसला. त्यामुळे महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुकीत काँग्रेस सावध झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले होते. तेव्हापासून महाराष्ट्रात INDIA Alliance अर्थात महाविकास आघाडीत उत्साहात आहे. मात्र, हरयाणाच्या निकालानंतर राहुल गांधींनी सर्वांना सावध केले आहे.