राज्यात 5257 नवीन रुग्ण, 2385 रुग्णांना घरी सोडले

342
corona virus

राज्यात कोरोनाच्या 5257 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 73 हजार 298 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 2385 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या 88 हजार 960 झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 52.37 टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात आज 181 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी 78 मृत्यू मागील 48 तासांमधील तर उर्वरित 103 मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 4.48 टक्के एवढा आहे. मागील 48 तासात झालेले 78 मृत्यू हे मुंबई मनपा-21, ठाणे-2, ठाणे मनपा-2, नवी मुंबई मनपा -1, भिवंडी निजामपूर मनपा-1, मीरा भाईंदर मनपा -4, मालेगाव मनपा-1, जळगाव-1,जळगाव मनपा-2, पुणे-1, पुणे मनपा-20, पिंपरी चिंचवड मनपा -2, सोलापूर-2, सोलापूर मनपा-6, संभाजीनगर-3, संभाजीनगर मनपा-6, धाराशिव-1, अमरावती मनपा-1, नागपूर मनपा-1 या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 9 लाख 43 हजार 485 नमुन्यांपैकी 1 लाख 69 हजार 883 नमुने पॉझिटिव्ह (18 टक्के) आले आहेत.

मुंबईत कोरोनाचे 1247 नवे रुग्ण, 43 हजार 545 कोरोनामुक्त
मुंबईत एकाच दिवसात कोरोनाचे 1247 नवे रुग्ण नोंद झाले असून 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 391 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या 43 हजार 545 वर पोहोचली आहे.

मुंबईतील एकूण मृतांच्या आकडेवारीत प्रलंबित 71 अहवालांचाही समावेश केल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण मृतांची संख्या आता 4461 झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या