राज्यात आज 24 हजार 282 कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण पूर्ण

राज्यात आज 290 केंद्रांवर 24 हजार 282 (83 टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. राज्यात आज सर्वात जास्त गोंदिया जिल्ह्यात 143 टक्के लसीकरण झाले आहे. पाठोपाठ गडचिरोली, वर्धा, अमरावती, जालना, बीड, धुळे, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यात 100 टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाले. सोमवारपासून मंगळवार वगळता पाच दिवस लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे. 31 जानेवारीला पोलिओ लसीकरण असल्याने 30 जानेवारीचे कोरोना लसीकरण सत्र होणार नाही.

आज सायंकाळी सात वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून काही ठिकाणी लसीकरणाचे सत्र उशिरापर्यंत सुरु होते त्यामुळे अंतिम आकडेवारीत बदल होऊ शकतो. राज्यात आतापर्यंत एकूण 99 हजार 242 जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली. राज्यात आज 297 जणांना कोवॅक्सिन लस देण्यात आली असून आतापर्यंत एकूण 1572 जणांना ही लस देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या