राज्यात 4500 रुग्ण बरे होऊन घरी, 6741 नवीन रुग्ण

450

राज्यात आज ४ हजार ५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५. ६७ टक्के आहे. दिवसभरात कोरोनाच्या ६ हजार ७४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ७ हजार ६६५ रुग्णांवर (अॅक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात आज २१३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंदझाली असूनसध्या राज्यातील मृत्यूदर ४ टक्के एवढा आहे. राज्यात नोंद झालेले २१३ मृत्यू आहेत त्यात मुंबई ७०, ठाणे-१५, ठाणे १५, नवी मुंबई -८, कल्याण-डोंबिवली -७, उल्हासनगर -७, भिवंडी-निजामपूर -१२, वसई-विरार -८, रायगड-२, पनवेल -१, नाशिक-१, नाशिक महापालिका -५, नगर-२, धुळे -२, जळगाव-७, जळगाव -१, पुणे-६, पुणे महापालिका -१०, िंपपरी-िंचचवड ९, सोलापूर-३, सोलापूर-३, सातारा-१, सांगली मिरज कुपवाड -१,रत्नागिरी-२, संभाजीनगर ४,परभणी-१, परभणी -१, लातूर-२, नांदेड-३, अकोला-१, बुलढाणा-१, नागपूर १, भंडारा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

मुंबईत ९६९ नवे रुग्ण, ७० जणांचा मृत्यू
मुंबईत एका दिवसात कोरोनाचे ९६९ नवे रुग्ण सापडले असून गेल्या ४८ तासांत ७० जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या २४ तासांत १०११ जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता ६६ हजार ६३३ वर पोहोचली आहे. मुंबईत ७० जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता ५ हजार ४०२ झाली आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या २२ हजार ८२८ वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईतील कोरोनाची लागण होण्याचा डबिंलग रेट आता ५२ दिवसांवर आला आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत ४ लाख ०१ हजार ७४१ चाचण्या झाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या