
राज्यात चाचण्या आणि रुग्ण संपर्कातील लोकांचा शोध सुरू झाल्याने कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. दिवसभरात 23 हजार 816 रुग्णांची नोंद झाली असून 13 हजार 906 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत 6 लाख 86 हजार 462 रुग्ण बरे झाले असून 2 लाख 52 हजार 734 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात बुधवारी 325 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.87 टक्के एवढा आहे. आजपर्यंत पाठिण्यात आलेल्या 48 लाख 83 हजार 6 नमुन्यांपैकी 9 लाख 67 हजार 349 नमुने पॉझिटिव्ह (19.81 टक्के) आले आहेत. राज्यात 16 लाख 11 हजार 280 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत दिवसभरात 2,227 रुग्ण
मुंबईत बुधवारी दिवसभरात 2,227 कोरोना रुग्ण सापडले असून गेल्या 24 तासांत 839 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या आता 1 लाख 26,745 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 43 जणांचा मृत्यू झाला.
मुंबईत 43 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 7 हजार 982 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 79 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 63 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 25 हजार 659 इतकी आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 8 लाख 56 हजार 454 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1 लाख 60,744वर पोहोचली आहे.























































