प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांसाठी नेमबाजी केंद्र उभारणार! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

692

‘‘यंदाच्या राष्ट्रीय पोलीस नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या पोलिसांनीही एखादा करंडक जिंकायला हवा होता. आपल्याकडे नेमबाजीच्या सुविधांची कमतरता आहे याची मला कल्पना आहे. त्यामुळे भविष्यात पोलिसांसाठी प्रत्येक जिह्यात नेमबाजी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येईल’’, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात 13 व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे, खासदार श्रीरंग बारणे, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते.

देशातील प्रत्येक पोलिसाला अचूक वेध साधता आला पाहिजे. पोलीस सामाजिक स्वास्थ्य राखायचे काम करतात. त्यामुळेच पोलिसांचे स्वास्थ्य राखणे ही सरकारची जबाबदारी आहे. पोलिसांच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी महाराष्ट्र शासन आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट करण्यास वचनबद्ध आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील प्रत्येक जिह्यात पोलिसांसाठी नेमबाजी प्रशिक्षण केंद्र उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

गुन्हेगार नक्कीच धसका घेतील!

जय-पराजय हा खेळाचा भाग होय. त्यामुळे जिद्द असेल तर एक दिवस तुमचा विजय निश्चित आहे. या नेमबाजी स्पर्धेतील पोलिसांचा गुणतक्ता बघितल्यास गुन्हेगारही नक्कीच तुमचा धसका घेतील,’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पोलीस खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले. याचबरोबर ‘ज्येष्ठ नेमबाज तोमर दादी या देशाच्या प्रेरणा आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमुळे या स्पर्धेची शोभा वाढली’, असेही मुख्यमंत्री पुढे म्हणाले.

श्री अंबाबाईच्या साक्षीने सार्वजनिक आरोग्य व वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून, धनुष्यबाणाची प्रतिमा भेट देत त्यांचे स्वागत केले. अपक्ष निवडून आल्यानंतर यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता.

आपली प्रतिक्रिया द्या