‘पाटील’ कसा फटका लगावतो समजतही नाही! चंद्रकांत पाटलांचा पवारांना टोला

2384

चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमध्ये अडकवून ठेवल्याचे शरद पवार सांगत आहे. पण तुम्ही या पाटलाला ओळखलेलेच नाही. हा ‘पाटील’ चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता कसा फटका लगावतो हे समजतही नाही, असा टोला भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील शिवसेना उमेदवार आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी आयोजित महायुतीच्या मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी पवार यांना टीकेचे लक्ष्य केले. पवार तुम्हाला पाटील अजून कळलेले नाहीत. माझा अनुभव तुम्ही घेतलेला नाही, असे म्हणत विरोधकांनी पाटलांची कोंडी केली या विधानाचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला.

मनसे बळीचा बकरा

कोथरूडमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला उमेदवार मिळाला नाह़ी त्यामुळे मनसेच्या उमेदवाराला सर्वपक्षीय म्हणून पाठिंबा दिला आहे. आघाडी करताना मनसेला त्यात घेतले नाही, आता कुणाला तरी बळीचा बकरा करायचा म्हणून मनसेला पाठिंबा दिला आहे. काही झाले तरी येथून आपण विजयी होणारच, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या