निवडणूक प्रचारसभेत प्लॅस्टिकचा वापर ; राष्ट्रवादी काँग्रेसला 10 हजारांचा दंड

282
ncp

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुर्तिजापूरमध्ये आयोजित केलेल्या शरद पवारांच्या प्रचारसभेच्या दरम्यान प्लॅस्टिकबंदीचे उल्लंघन करण्यात आले. लोकांना पाणी पिण्यासाठी प्लॅस्टिक ग्लासचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसला मुर्तिजापूर नगरपालिकेने दहा हजारांचा दंड ठोठावला आहे.

मुर्तिजापूर येथील राष्ट्रवादीचे उमेदवार रवी राठी यांच्या प्रचारार्थ 9 ऑक्टोबरला गाडगेबाबा मैदानाकर सभा झाली होती. या सभेसाठी आलेल्या लोकांसाठी पाच हजारांपेक्षा अधिक प्लॅस्टिक ग्लासचा वापर करण्यात आला होता. माध्यमांनी हा मुद्दा लाकून धरल्यावर नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजय लोहकर यांनी तत्काळ कारवाई करून राष्ट्रवादीला दहा हजारांचा दंड ठोठावला. दरम्यान, शुक्रवारी दुपारी ही दंडाची रक्कम राष्ट्रवादीकडून भरण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या