माळशिरसमधून ऊसतोड कामगाराचा मुलगा झाला आमदार

1056

सोलापूरच्या माळशिरस मतदारसंघातून भाजपचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते राम सातपुते यांनी दणदणीत विजय मिळवला. राम सातपुते मूळचे बीड जिह्यातील असून त्यांचे वडील मोहिते-पाटील यांच्या साखर कारखान्यावर ऊसतोडीसाठी येत असत. झोकून देऊन संघाचे काम करणाऱया सातपुते यांनी आपली परिस्थिती हलाखीची असली तरीही मुख्यमंत्र्यांनी दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडणारच असा निर्धार केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या