राज्यात 15 ऑगस्टपर्यंत मासेमारीस बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

राज्यातील मत्स्य साठय़ाचे संवर्धन, माशांना प्रजननासाठी अधिक कालावधी उपलब्ध करून देणे तसेच पावसाळ्यातील खराब हवामानामुळे मच्छीमारांची जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी राज्य सरकारने पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी वाढवून 15 ऑगस्टपर्यंत करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली. यापूर्वी राज्याच्या क्षेत्रात 1 जून ते 31 जुलै या 61 दिवसांच्या कालावधीत यांत्रिक आणि यंत्रचलित मासेमारी नौकांना बंदी होती.