महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातून 90 हजार लोकांची सुखरूप सुटका

राज्यात अनेक जिल्ह्यांत पूरपरिस्थिती ओढवली आहे. बचावकार्य करण्यात येत असून मदत व पुनर्वसन विभागाने शनिवारी सकाळी दिलेल्या माहितीनुसार पूरग्रस्त भागातून सुमारे 90 हजार लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे. एकूण 76 मृत्यू झाले असून 75 जनावरांचे मृत्यू झाले आहेत. एकंदर 38 लोक जखमी असून तीस लोक बेपत्ता आहेत.

राज्यात रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर, रत्नागिरीतील चिपळूण आणि खेड, सातारा, कोल्हापूर, सांगली, ठाणे, पालघर हे जिल्हे पूरबाधित आहेत. या जिल्ह्यात मदत आणि पुनवर्सनाचं कार्य सुरू आहे. एनडीआरएफची 17 पथकं आणि अन्य 8 पथकं विविध ठिकाणी मदतकार्य करत आहेत. त्यांच्यासोबत सैन्यदल, नौदल आणि वायूदलाची पथकंदेखील मदतकार्य करत आहेत.

ठाणे जिल्ह्यात 2, पालघर जिल्ह्यात एक, कोल्हापूर जिल्ह्यात चार तर रत्नागिरी जिल्ह्यात सहा, रायगड जिल्ह्यात 1 एनडीआरएफ पथकं कार्यरत आहेत. त्याखेरीज रत्नागिरी जिल्ह्यात एक एक सैन्यदलाचे, दोन कोस्ट गार्ड, एक वायूदलाचे आणि पाच नौदलाची पथके बचावकार्य करत आहेत.

आतापर्यंत पूरग्रस्त भागातून सुमारे 90 हजार लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे. एकूण 76 मृत्यू झाले असून 75 जनावरांचे मृत्यू आहेत. एकंदर 38 लोक जखमी असून तीस लोक बेपत्ता आहेत. बचावकार्य अद्यापही सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या