स्पीड ब्रेकर, खड्डे येतात तरी स्टेअरिंगवरची पकड सुटू देणार नाही!

मुख्यमंत्री असूनही मी स्वतः उत्तम गाडी चालवतो असा माझ्याविषयी उल्लेख होतो. उत्तम गाडी चालवतोच, पण कार आणि सरकार हे दोन्ही चालवतोय. मधे मधे स्पीड ब्रेकर येतात, खड्डेही असतात, पण तरीसुद्धा स्टेअरिंगवरची पकड मी सुटू देणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

सह्याद्री अतिथीगृह येथे परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 32व्या राज्य रस्ता सुरक्षा महिन्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी माहिती देताना निवेदिकेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः गाडी चालवतात. कोरोना, नैसर्गिक आपत्ती असे अनेक अडथळे आले तरी ते आपल्या हाती स्टेअरिंग ठेवून यशस्वीरीत्या सरकार चालवत आहेत असा उल्लेख केला. तोच धागा पकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्टेअरिंगवरची पकड सुटू देणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या