
महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व आयुक्तालयांमध्ये लवकरात लवकर नवीन फौजदारी कायदे लागू करावेत, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिले. त्यावर हे कायदे लागू करण्यासाठी आम्ही वेगाने काम करू, असे फडणवीसांनी सांगितले.तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या महाराष्ट्रातील अंमलबजावणी- संदर्भात आज दिल्लीत बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.