राज्यात आचारसंहिता लागू, या दिवशी होणार मतमोजणी

1893

निवडणूक आयोगाने हरयाणा आणि महाराष्ट्रातील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. हरयाणा राज्यात 90 जागांसाठी तर महाराष्ट्रासाठी 288 जागांसाठी निवडणुका होणार आहेत.

दोन्ही राज्यात एकाच टप्प्यात पार पाडणार आहेत. निवडणुकीची अधिसूचना 27 सप्टेंबर रोजी जारी होणार आहे. 4 ऑक्टोबर ही उमेदवारी दाखल करण्याची अखेरची तारीख आहे. 5 ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी होईल. 7 ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख असेल. 21 ऑक्टोबर रोजी दोन्ही राज्यात मतदान पार पडले जाईल. तर 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाईल. म्हणजेच दिवाळीपूर्वी दोन्ही राज्यात नवे सरकार येण्याची दाट शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या